मी जे भोगले तुमची मुलंही भोगतील; माझा शाप आहे तुम्हाला – तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ता पुन्हा एकदा उखडली आणि या भरात तिने एक ताजे स्टेटमेंट जरारी केले. या स्टेटमेंटमध्ये तनुश्रीने नाना पाटकेकर, राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर असली नसली सगळी भडास काढली. केवळ इतकेच नाही तर माझा शाप तुम्हाला भोवणार, कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असेही ती म्हणाली.

आपल्या स्टेटमेंटमध्ये ती म्हणते, ‘हॉर्न ओके प्लीजच्या गाण्यासाठी मीच गणेश आचार्यच्या नावाची शिफारस केली होती. पण वेळ आली तेव्हा त्यानेही माझी मदत केली नाही. माझ्या एफआयआरमध्ये त्याचेही नाव आहे. माझे शोषण केवळ एका व्यक्तिनेने नाही तर सेटवर हजर असलेल्या चार लोकांनी केले. मी केवळ २४ वर्षांची होते व बॉलिवूडमध्ये करिअर बनवू इच्छित होते. गणेश आचार्यने या घटनेनंतर मीडियात माझ्याबद्दल भ्रामक गोष्टी पसरवल्या आणि माझे करिअर संपवले.

मी माझ्या मनातून, आत्म्यातून राखी, गणेश आचार्य, नाना, राकेश सारंग आणि निर्माता सामी सिद्दीकीला शाप देते. तुमची मुले, त्यांची मुले सगळयांच तोच मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागेल, जो मी व माझ्या कुटुंबाने सहन केला.

महत्वाच्या बातम्या –

You might also like