‘तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी देशातील अनेक नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.  यातच आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की,‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असे म्हटले असून ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.’ या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. १४ जुलै २०२० रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.

 

You might also like