कंगणाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही- गीता फोगट

कंगना विरुद्ध शिवसेना शाब्दिक युद्ध सुरु असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. कंगणााच्या कार्यालयावरील कारवाईनंतर ही कारवाई  चुकीची असल्याची अनेक नेटकऱ्यानी म्हंटले आहे. #ShameOnBMC हा हॅशटॅग सद्या ट्विटरवर चांगलाच ट्रेंडिंग होताना दिसला. तसेच विरोधी पक्षानी शिवसेनवर टीका केली असून ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचं म्हटलंय.

त्यातचं या प्रकरणावर महिला कुस्तीपटू गीता फोगटने हीने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवर कंगना रनौतला समर्थन देत शिवसनेनेवर टीका केली आहे. गीता फोगटने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऐसा लग रहा जिसकी लाठी उसकी भैंस !! खैर कंगना राणावत का ऑफ़िस तोड सकते है हिम्मत नहीं !!!!

दरम्यान,शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तसेच तिने मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र कंगनाने तलवार म्यान केली नसल्याने हा वाद चिघळताना दिसतोय.

 

You might also like