‘तुम कुछ नहीं हो’ ; कंगना रणौतचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर घणाघात

कालचा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरला आहे. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिले आहे. शिवसेनेकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नसली तरी कंगनाने आज देखील आपले शाब्दिक युद्ध सुरुच ठेवले आहेत.

कंगनाने आज सकाळी जळजळीत ट्विट केले असून तिचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. ” तुम्हारे पिताजी के अच्छे कर्म तुम्हें दौलत तो दे सकते हैं मगर सम्मान तुम्हें खुद कमाना पड़ता है, मेरा मुँह बंद करोगे मगर मेरी आवाज़ मेरे बाद सौ फिर लाखों में गूंजेगी, कितने मुँह बंद करोगे? कितनी आवाज़ें दबाओगे? कब तक सच्चाई से भागोगे तुम कुछ नहीं हों सिर्फ़ वंशवाद का एक नमूना हो ” असा घणाघात तिने ट्विटद्वारे केला आहे.

या ट्विटमधून तिने वडिलांची पुण्याई तुम्हाला पैसा देऊ शकते पण सम्मान स्वतःला कमवावा लागतो, माझे तोंड बंद कराल तर माझ्यानंतर लाखोंचा आवाज गुंजेल, कित्येकांचे तोंड बंद कराल? किती जणांचे आवाज दाबाल? कधी पर्यंत सत्यापासून दूर धावाल?  तू काहीच नाहीयेस. फक्त वंशवादाचा एक नमुना आहे, अशा शब्दांत तिने टीका केली आहे.

दरम्यान, कंगना रणौतच्या अनधिकृत बांधकामावर काल करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला. तर, कंगनाच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने देखील या तोडकामास स्थगिती दिली. यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी टोकाला गेलेले दिसून आले.

You might also like