यशराजच्या कास्टिंग डायरेक्टरने एका भेटीसाठी घेतले इतके रुपये…!

पायल रोहतगी हिने यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टरवर धक्कादायक आरोप केले आहे.पायलने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने यशराज फिल्म्स आणि त्यांचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मावर आरोप केले आहेत. शानू शर्मा फक्त एका भेटीसाठी तिच्याकडून पाच हजार रुपये घेतल्याचा खुलासा यात केला आहे.

“अनेकजण मला माझ्या अनुभवाविषयी विचारत होते. तर आज मी तुम्हाला त्याबद्दल सांगू इच्छिते. मुंबई पोलीस ज्या लोकांची चौकशी करत आहेत, त्यात शानू शर्माचंही नाव आहे. यशराज फिल्म्सचा तो कास्टिंग डायरेक्टर आहे. मी जेव्हा छोट्या बजेटच्या चित्रपटांकडून मोठ्या बजेटच्या चित्रपटांकडे वळत होती, तेव्हा शानू शर्माने मला भेटण्यास साफ नकार दिला होता. त्यानंतर सुद्धा मी त्यांच्याशी भेटण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी माझ्याकडून एका भेटीसाठी पाच हजार रुपये घेतले होते. ज्यांनी थोडंफारच काम केलंय, त्यांच्यासोबत हे कास्टिंग डायरेक्टर असे वागू शकतात, तर इंडस्ट्रीमध्ये तर इतर लोकांसोबत अजून काय काय करत असतील”, असा सवाल पायलने या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

 

सलमान ‘बिग बॉस १४’ साठी घेणार इतके कोटी ?

You might also like