यशच्या वाढदिवसापूर्वीच केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर व्हायरल…

अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या अगदी आधी केजीएफ चॅप्टर 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यशच्या चाहत्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहित होते. फिल्मच्या टीमने ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे असं म्हणतात की या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये यशने चाहत्यांना सांगितले की, ‘असे काही लोक आहेत ज्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लीक केला आहे. मला याचे कारण माहित नाही आणि मला याची चिंताही नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो पण मला माहित आहे की तुमच्यातील काहींनी बर्‍याच योजना आखल्या आहेत. अकाली टीझर रिलीझ झाल्याबद्दल मी दिलगीर आहे.

हा चित्रपट मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे आणि या टीझर रिलीजमध्ये चित्रपटाची पहिली झलक दिसून येते. स्टायलिश स्टार यश व्यतिरिक्त अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, बॉलिवूड स्टार संजय दत्त आणि बॉलिवूडची नायिका रवीना टंडनदेखील ट्रेलरमध्ये दिसले आहेत. या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन हे महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसले आहेत.

केजीएफ चॅप्टर 2 चा टीझर गुरुवारी प्रदर्शित झाला आहे.लाँचिंगच्या काही तास आधी तो प्रदर्शित झाला आहे. यशचा 35 वा वाढदिवस असल्यामुळे टीझर शुक्रवारी 10:16 वाजता रिलीज होणार होता. तथापि, याआधीच चुकीमुळे तो रिलीज करण्यात आला आहे. टीझरची सुरूवात रॉकी आपल्या मरणा-या आईला सांगतो की तो गरीबीत मरणार नाही.

 

You might also like