सोनी मराठीवर होणार ‘बॉईज 2’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

‘बॉईज २’ चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार असल्यामुळे कॉलेजमधली त्यांची मज्जा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सोनी मराठीने आतापर्यंत अनेक मालिकांतून प्रेक्षकांची अभिरुची जाणली आहे आणि आता सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दाखवून प्रेक्षकांचा विकेंडही स्पेशल बनवत आहेत. ‘बॉईज २’ चित्रपटात आताची पिढी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत अथवा त्यांच्या अवतीभोवती जे काही घडते ती परिस्थिती मांडली आहे.

या चित्रपटाचे  दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. शर्वरी जमेनिस, यतिन कार्येकर, अमित्रीयन पाटील, पल्लवी पाटील, ओंकार भोजने, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांच्या देखील भूमिका यामध्ये आहेत.या ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पाहा रविवारी २४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ फक्त फक्त सोनी मराठीवर.

महत्वाच्या बातम्या –