अजय सह ‘हे’ कलाकार झळकणार ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात

‘सिम्बा’ आणि ‘टोटल धमाल’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. या चित्रपटांच्या यशानंतर अजय देवगणकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत असून त्यामध्ये आता दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे.

या चित्रपटानंतर अजय लवकरच अभिषेक दुधैया यांच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसह संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, राणा दग्गुबती आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. भारत पाक युद्धादरम्यान कर्णिक हे हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते. हवाई दलाच्या हल्ल्यात भूज तळावरील धावपट्टी उद्ध्वस्त झाली.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like