आवडत्या नाट्यगृहात स्पृहा जोशी घेऊन येणार शुभारंभाचा प्रयोग ?

सध्या लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प होतं. मात्र, आता सरकारच्या परवानगी नंतर आता हळूहळू चित्रीकरण पूर्ववत होताना दिसत आहे. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह अद्याप बंदच आहेत. यातच स्पृहा जोशीने नुकतीच केलेली पोस्ट पाहून सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. स्पृहाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत शुभारंभाचा प्रयोग, तुमच्या सर्वात आवडत्या नाट्यगृहात, रविवार 12 जुलैअसं यात लिहीलं गेलय. शिवाय कॅप्शनमध्ये स्पृहा लिहीते की,काहीतरी श्रवणीय.. प्रेक्षणीय.. उत्साहवर्धक.. लवकरच.
लॉकडाउनच्या काळात स्पृहाच्या ‘खजिना’ या लाईव्ह इन्स्टाग्राम शोला व्ह्यूवर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता स्पृहा आणखी काय नवं घेऊन येत आहे याचीच उत्सुकता आहे.