भन्साळींसाठी एकत्र येणार सलमान-प्रियांका….?

सलमान खान भन्साळींच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सलमानचे नाव चित्रपटासाठी निश्चित झाल्यानंतर भन्साळी आता चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी प्रियंका चोप्राच्या नावाचा विचार करत आहेत.

प्रियंकाने एका कार्यक्रमात भन्साळींशी चित्रपटासंदर्भात बोलणे चालू असल्याचे मान्य केले.  प्रियंका-सलमानमधील भारत चित्रपटानंतर सुरु असलेला वाद माहित आहे. ‘भारत’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायला अवघे १० दिवस बाकी असताना प्रियंकाने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. तिच्या अव्यवहारिक वागण्याबद्दल सलमानने एका कार्यक्रमात उघडपणे आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. तर दुसरीकडे सलमानने प्रियंकासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चाही होत्या.

महत्वाच्या बातम्या –

You might also like