जुन्या शनू बेबीची होणार वापसी ?

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी राधिका, ‘नखरेल’ शनाया आणि राधिका -शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे.

प्रेक्षकांची आवडती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि मालिका देखील प्रेक्षकांच्या लवकर भेटीस येईलच, आणि हो शनाया पण परत येते येणार आहे. आता शनाया परत येतेय म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील, ती परत येणार म्हटल्यावर तिच्यासोबत कारस्थानं पण ओघाने येणारच.

लॉकडाऊनमुळे या आपल्या आवडत्या मालिकेच चित्रीकरण देखील बंद होतं, त्यामुळे प्रेक्षकांना मालिकांचे नवीन भाग पाहायला मिळत नव्हते. पण आता चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यामुळे सर्व नियम व अटींचं पालन करून आणि संपूर्ण खबरदारी घेऊन जोमाने मालिकांच्या चित्रीकरणालासुरुवात देखील झाली आहे.

तरुणांनाही लाजवेल असा साजरा केला मिलिंदच्या आईने वाढदिवस

You might also like