करिना ‘डान्स इंडिया डान्स’ नंतर पुन्हा पडद्यावर झळकेल का?

मोठ्या पडद्यावर आपल्या कौशल्याची छाप सोडलेली अभिनेत्री करिना कपूरने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. सध्या ती ‘डान्स इंडिया डान्स’ रियालिटी शोमध्ये परिक्षकाची धूरा सांभाळत आहे. परिक्षकाच्या गादीवर बसलेली बेबो चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. त्याचप्रमाणे शोमधील तिच्या अदा सर्वांच घायाळ करत आहे. एकंदरीत तिच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत.
पण या शो नंतर करिना पुन्हा छोट्या पडद्यावर झळकेल का? हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. बॉलिवूडमध्ये उत्तम रित्या सक्रीय झाल्यानंतर करिनाला आणखी रियालिटी शो करण्याची इच्छा आहे. त्याचप्रमाणे बेबो अनेकांच्या प्रेरणास्थानी देखील आहे.
या शोमध्ये ती फक्त एका भागासाठी तब्बल ३ कोटी रूपयांचे मानधन स्वीकारत आहे. ‘मला असं वाटतं अभिनेत्रींना सुद्धा समान हक्क मिळायला हवा. मला समानतेवर विश्वास आहे.’ असं म्हणतं तिने समानतेचा संदेश दिला आहे.