‘सेक्रेड गेम्स २’मध्ये झळकणार ‘हा’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेता

‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. या सिझनमध्ये जुन्या भूमिकांसह काही नवीन चेहऱ्यांचीही भर पडली आहे.

त्यापैकी रणवीर शौरी व कल्की कोचलीन तर ट्रेलरमध्ये झळकले आहेत. पण यामध्ये टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ‘IWMBuzz.com’ने दिलेल्या वृत्तानुसार इंद्रनील भट्टाचार्य यांची ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये वर्णी लागली आहे. इंद्रनील यांनी ‘ससुराल गेंदा फूल’, ‘दिल संभल जा जरा’ यांसारख्या मालिकांमध्ये व ‘गोलमाल अगेन’, ‘नूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याचसोबत हर्शिता गौर आणि सोभिता धुलिपाला यांच्याही सीरिजमध्ये भूमिका असल्याचं कळतंय.

‘सेक्रेड गेम्स २’चं दिग्दर्शन अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी केलं आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ही सीरिज ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सिझनमध्ये न मिळालेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना या सिझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

You might also like