अभिनेत्रींच्या यादीमध्ये ऐश्वर्याचे नाव का नाही ?

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद सुरु आहे. सोशल मीडिया यूजर करण जोहर आणि इतर स्टार किड्स यांच्यावर निशाणा साधत आहेत. आता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
करण जोहर अक्षयला काही अभिनेत्रींची नावे सांगतो आणि त्यातील सर्वात चांगली अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारतो. त्यावेळी त्यामध्ये दीपिका पदूकोण, करीना कपूर खान, कटरीना कैफचे नाव असते. या अभिनेत्रींची नावे ऐकून अक्षयला प्रश्न पडतो. तो करणला विचारतो या यादीमध्ये ऐश्वर्या रायचे नाव का नाही?
अक्षयचा हा प्रश्न ऐकून करण थोडा शॉक होतो आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो. त्यानंतर अक्षय पुढे म्हणतो ‘पण मला आश्चर्य वाटत आहे की या यादीमध्ये ऐश्वर्याचे नाव कसे नाही?’ करणच्या कॉफी विथ करणमधील हा जुना व्हिडीओ ऐश्वर्याच्या एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.