जया बच्चन यांना इतका राग का येतो..?श्वेता बच्चनने केला खुलासा…!

जया बच्चन त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जातात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जयांचा भडकल्याचे किस्से आहेत. कधी मीडियावर, कधी सेल्फी घेणा-यांवर जया भडकल्यात. कधी संसदेतही त्यांचा ‘अँग्री’ अवतार पाहायला मिळाला.

जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. जया अचानक संतापतात याचे कारण आहे, त्यांचा आजार खुद्द श्वेताने याचा खुलासा केला.

जया बच्चन या claustrophobic या आजाराने पीडित आहे. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. या आजाराने पीडित व्यक्ती अचानक गर्दी पाहून बेचैन होते. अनेकदा तिला राग येतो. गर्दीच्या ठिकाणी हे लोक अस्वस्थ होतात. श्वेताने सांगितल्या नुसार, गर्दी पाहिली की, जया अस्वस्थ होतात. कुणी धक्का दिलेला वा चुकूनही स्पर्श केलेले त्यांना सहन होत नाही. कॅमेऱ्या प्रकाश डोळ्यांवर पडला तरी त्यांना त्रास होतो. कदाचित हेच कारण आहे की, मीडियाला अनेकदा त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.

महत्वाच्या बातम्या –

You might also like