कुत्र्या-मांजराला कळतं की,आत्महत्या करू नये मग ते माणसाला का कळत नाही?

आत्महत्या कोण कधी करेल हे सांगू शकत नाही मात्र कुत्र्या मांजराला कळतं की आपण आत्महत्या करू नये. मग ते माणसाला का कळत नाही ? असा सवाल अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे.
ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान आपल्याला निसर्गाकडून भरपूर शिकलं पाहिजे आणि स्ट्रॉंग, पॉझिटिव्ह राहिले पाहिजे असे देखील ते म्हणाले आहेत. अभिनेता सयाजी शिंदे आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आलेले होते . यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अभिनेता आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वरती भाष्य केलं. आत्महत्या कोण कधी करेल, कोणी सांगू शकत नाही. मात्र कुत्र्या, मांजराला कळतं की आत्महत्या आपण करू नये. मग ते माणसाला का कळू नये ? असा सवाल त्यांनी विचारलाय. तसच आपणच निसर्गाकडून भरपूर शिकले पाहिजे स्ट्रॉंग राहिले पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहिले पाहिजे असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, सध्याच्या काळात जुन्या झाडांचा शोध सर्वांनी घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त जुनी आणि मोठी झाडे ही टॉप टेन च्या यादीत येणे गरजेचे आह. तसेच त्या झाडांना सेलिब्रिटी चा दर्जा देखील दिला गेला पाहिजे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवला गेला पाहिजे. त्यामुळे लेखक, कवी, आमदार, खासदार यापैकी कोणी सेलिब्रिटी नाहीत तर दोनशे ते तीनशे वर्ष जगणारे झाडं हीच सेलिब्रिटी असल्याचे स्पष्ट होईल, असं त्यांनी म्हटले आहे.
सध्या राज्यभर वाघांच्या नसबंदी संदर्भात चर्चा सुरू असताना सयाजी शिंदे यांनी त्यावरती भाष्य केलं आहे. वाघांनी किती माणसांना मारलं आणि माणसाने किती वाघांना मारले एवढा हिशोब केला तर समजेल की माणूस किती वाईट आहे. त्यामुळे खरं तर वाघांना माणस खायला टाकली पाहिजे ही परिस्थिती आहे. माणसाने माणसातला माणूस पण चेक करायला हवे असे देखील त्यांनी म्हटले आहे.