मला असं का वाटतंय कि सुशांतची हत्या करण्यात आली आहे ?

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण रोज नवनवे वळण घेताना दिसत आहे. त्यातच आता सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सुशांतच्या आत्महत्येवर एक खबळजनक विधान केले आहे. त्यांनी सुशांतच्या आत्महत्येला हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
मयुरी देशमुखच्या पतीची राहत्या घरात आत्महत्या
‘मला असं का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे’, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचं गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी अनेक दिग्गजांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली आहे. त्यात सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट आता चर्चेत आलं आहे.
तक्रार दाखल होताच रिया मुंबईतून नौ दो ग्यारा
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वासह सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्ररकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान,सुशांतला न्याय मिळावा म्हणून चाहत्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यातच अलिकडेच पार्थ पवार यांनीदेखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
Why I think Sushanth Singh Rajput was murdered pic.twitter.com/GROSgMYYwE
— Subramanian Swamy (@Swamy39) July 30, 2020