‘लागीरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांची ‘या’ चित्रपटात वर्णी

‘पळशीची पीटी’ हा चित्रपट एक वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी कलाकारांच्या रूपाने सगळे पत्ते खोलले आणि सर्वत्र एकचं चर्चा सुरू झाली. ‘लागीर झालं जी’ मधील जेमतेम सर्वच कलाकार या चित्रपटात आहेत. मालिका संपल्यावर काय, असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना होताच, पण यावर दिग्दर्शकांनी मौन सोडलं आहे.
२३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट ‘पळशीची पीटी’मध्ये ‘भागी’ ची भूमिका साकारणारी किरण ढाणे, राहुल बेलापूरकर, राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे, विद्या सावळे, शिवानी घाटगे, दिक्षा सोनवणे, निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे.
तसेच तेजपाल वाघ यांनीदेखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून लागीर…मध्ये ‘जितू काका’ यांची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच एडिटिंग केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व लागीरंची टीम प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार झालेली आहे.