Throwback: तिने लावलेल्या आरोपांमुळेच सलमानचे आयुष्य उध्वस्त झाले…!

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे अफेअर बॉलिवूडच्या चर्चित अफेअरपैकी एक आहे. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले.

या ब्रेकअपसाठी सलमानचा रागीट स्वभाव आणि त्याने तिला केलेली मारहाण कारणीभूत असल्याचा आरोप स्वत: ऐश्वर्याने एका मुलाखतीत केला होता. आमच्या ब्रेकअपनंतर सलमानने मला फोनवर वाट्टेल ते बोलला. इतकेच नाही तर तो नेहमी माझ्या को-स्टार्ससोबत माझे अफेअर असल्याचा संशय घ्यायचा. सलमानने अनेकदा मला मारहाणदेखील केली होती, असे ती म्हणाली होती. तिचे हे आरोप आठवण्याचे कारण म्हणजे, सलमानचा भाऊ सोहेल खान याची सध्या व्हायरल होत असलेली एक जुनी मुलाखत.

ऐश्वर्याच्या आरोपानंतर सोहेलने एका मुलाखतीत ऐश्वर्याला लक्ष्य केले होते. त्याच्या या मुलाखतीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आज ती लोकांसमोर रडतेय. पण एकेकाळी तीच सलमानसोबत फिरत होती. आमच्या घरी येत होती. आमच्या कुटुंबाचा भाग म्हणून वावरत होती. तिने कधीच सलमानवरचे प्रेम व्यक्त केले नाही. यामुळे सलमान सतत असुरक्षित वाटायचे. ती आपल्यावर किती प्रेम करते, हे सलमानला जाणून घ्यायचे होते. पण तिने कधीच तिच्या प्रेमाची कबुली दिली नाही. तिने लावलेल्या आरोपांमुळेच सलमानचे आयुष्य उध्वस्त झाले, असे सोहेल या मुलाखतीत म्हणाला होता.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like