…..जेव्हा राखी सावंतनं घातला होता मोदींचा फोटो असलेला ड्रेस; पाहा फोटो

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच आपल्या उलट सुलटच वक्तव्यामुळे चर्चेत असते. याशिवाय वादग्रस्त वक्तव्ये, बोल्ड फोटो आणि व्हिडीओ हेही तिच्या चर्चेत राहण्याचं एक कारण समाजल जात. विशेष म्हणजे असं उलटं पालटं करूनही ती स्वत:ला नेहमीच चर्चेत ठेवू पाहत असते.

नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिनं काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. सुशांत सिंह राजपूत तिच्या स्वप्नात आला होता आणि माझ्या पोटी तो जन्म घेणार आहे असा दावा तिनं केला होता. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला होता.

आता राखीचा एक जुना किस्सा समोर आला आहे जेव्हा तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला शॉर्ट ड्रेस घातला होता. यानंतर खूपच खळबळ उडाली होती. हा किस्सा 2014 सालचा आहे. तेव्हा गुजराजतचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्री मोदी भाजपकडून पंतप्रधान पदाचे दावेदार होते. राखी पीएम मोदींची खूप मोठी फॅन आहे. तिला वाटत होतं की, मोदींनीच निवडणूक जिंकावी. मोदींना समर्थन दाखवण्यासाठी तिनं असा ड्रेस परिधान केला होता. राखीच्या ड्रेसमुळं फक्त देशात नाही तर जगभरात चर्चेत आली होती.राखी अमेरिकेतील एका प्री इंडिपेंडंस पार्टीत हा ड्रेस घालून आली होती.

या शॉर्ट ड्रेसला तिनं हॉटनेसचा तडकाही दिला होता. याची खूप चर्चा झाली. राखी प्रचंड ट्रोल झाली. FIR दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण पुढं गेलं होतं. तिला याचे कारण विचारले असता तिनं सांगितलं की, ही तिचं मोदींवरील प्रेम आहे. ज्या प्रकारे पंतप्रधानांचा नागरिकांवर हक्क असतो तसाच नागरिकांचाही त्यांच्यावर हक्क असतो.

You might also like