हा काय तमाशा चालू आहे? कंगना राणावतला संजय राऊतांनी झापलं

कायमच आपल्या जळजळीत वक्यव्यांसाठी आणि भुवया उंचावणाऱ्या गौप्यस्फोटांसाठी चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिच्या एका ट्विटमुळं आता तिच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे. पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवणाऱ्या बी- टाऊनच्या या क्वीना आता शिवसेनेच्या संजय राऊत यांनीही खडे बोल सुनावले आहेत. हा काय तमाशा चालला आहे, अशा शब्दांत त्यांनी तिच्यावर आगपाखड केली.

राम कदम यांच्या ट्विटला उत्तप देत कंगनानं आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटते असं ट्विट करत म्हटलं होतं. ‘मुव्ही माफीया गुंडापेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते’, असा खळबळजनक आरोप तिनं केला होता. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या; पण मुंबई पोलिसांकडून नको, असं तिनं ट्विटरवर म्हटलं आणि नव्या वादानं डोकं वर काढलं.

कंगनाच्या याच ट्विटचा समाराच घेत राऊतांनी तिला आपल्याच शैलीत सुनावल्याचं पाहायला मिळालं. ‘मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय’, असं ते म्हणाले.

You might also like