नक्की काय आहे ‘सावट’चे रहस्य हे उलगडणार २२ मार्चला

हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट योग्य-अयोग्याच्या पलिकडिल गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अनाउन्समेन्ट पोस्टरवर दिसणा-या काळ्या-पांढ-या रंगांना असलेली रक्ताची किनार हिच गोष्ट अधोरेखीत करत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ सिन्हा म्हणाले, “सावटचे कथानक हे आपल्या सर्वांमधल्या नकारात्मकतेचे प्रतीक आहे. आपला समाज आपल्याला बर्‍याचदा रूढींची पडताळणी न करता त्या पाळायला भाग पाळतो. सावटची कथा श्रध्दा आणि अंधश्रध्देच्या किनार्‍यावर असलेल्या या समजूतींवर भाष्य करते. या गुढकथेमधली पात्र तुम्हाला या चित्तथरारक प्रवासात खिळवून ठेवतात.”

सावट चित्रपटात स्मिता तांबे , मिलिंद शिरोळे, श्वेतांबरी घुटे आणि संजीवनी जाधव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०१९ ला आपल्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like