२०० किलो वजन उचलून टायगर श्रॉफने केले आश्चर्यचकित

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हटलं की, दोन नावे समोर येतात. ते म्हणजे हृतिक रोशन आणि ‘टायगर श्राफ  हा हृतिक रोशनला गुरू मानतो. हृतिकप्रमाणेच टायगरचेही फॅन फॉलोअर्स प्रचंड आहेत. अशातच टायगरने  आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आता तुम्ही म्हणाल कसे? तर टायगर श्रॉफने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. पण, त्यासोबतच तो चक्क २०० किलो वजन उचलतो आणि त्याच्या फॅन्सना आश्चर्यचकित करतो. या व्हिडीओला खूप लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.

या पोस्टला ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या त्याच्या व्हिडीओचे अभिनेता इशान खट्टरने देखील कौतुक केले आहे. टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, टायगर श्रॉफ हा अलीकडेच ‘स्टुडंट ऑफ  द ईयर २’ या चित्रपटात दिसला होता. त्याच्यासोबत अनन्या पांडे, तारा सुतारिया हे देखील दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. मात्र, आता तो गुरू मानत असलेल्या अभिनेता हृतिक रोशनसोबत ‘वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे.

 

You might also like