उमेशसोबत काम करण्याविषयी प्रिया म्हणते…

प्रिया बापट आणि उमेश कामत ‘टाईम प्लीज’ या चित्रपटानंतर आता ‘आणि काय हवं?’ या वेबसीरिजच्या माध्यमातून  प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे या वेबसीरिजमुळे या दोघांच्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं प्रियाने सांगितलं.

या वेबसीरिजमध्ये लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्यांमध्ये घडणारे अमुल्य आणि तितकेच महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत. मग यामध्ये स्वत: विकत घेतलेले पहिले घर, एकत्र साजरे केलेले सण या सर्वच गोष्टी कायम लक्षात राहणाऱ्या असतात. विशेष म्हणजे या साऱ्या घटनांचा आणि प्रिया, उमेशचा जवळचा संबंध असल्याचं प्रियाने सांगितलं.

 

You might also like