‘आमच्या पोलिसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही’

मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रनौतला माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी धारेवर धरले आहे. आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे निलेश राणे यांनी कंगनाला बजावले.

“दोन-तीन अधिकारी प्रेशरमध्ये आले, म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत (कंगना रनौत) कोण लागून गेली? अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही” असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

 

You might also like