करणी सेनेचा पलटवार, ‘आम्‍हीही बघतो, कंगनाचा मणिकर्णिका महाराष्‍ट्रात कसा प्रदर्शित होतो तर ?’

कंगना राणावतचा  ‘मणिकर्णिका’ चित्रपटचा वाद काही संपायचे नाव घेईना झाले आहे. करणी सेनाने हा चित्रपट प्रदर्शित करण्‍यास विरोध केला आहे. यावर कंगनाने प्रत्‍युत्तर देत म्‍हटले आहे की, ‘मी पण राजपूत आहे. जर मणिकर्णिकासाठी कुणी अडथळा आणला तर एकालाही सोडणार नाही.’ कंगनाच्‍या या वक्‍तव्‍यानंतर आता करणी सेनेने पलटवार केला आहे.करणी सेनेने कंगनाला धमकी दिली आहे.

करणी सेनेने कंगनाला उत्तर देत म्‍हटले आहे, ‘जर कंगना आम्‍हाला धमकी देत असेल तर आम्‍ही तिचा चित्रपट महाराष्ट्रात सहजासहजी रिलीज होऊ देणार नाही.’ सूत्रांच्‍या माहितीनुसार, महाराष्ट्र करणी सेनेचे अध्‍यक्ष अजय सिंह सेंगर यांनी म्‍हटले आहे की, ‘कंगनाचा चित्रपट सेट्स जाळून टाकू.’

कंगनाने म्‍हटले होते, ‘चार इतिहासकारांनी मणिकर्णिका चित्रपट फायनल केले आहे. आम्‍हाला सेन्‍सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. याबाबत, आम्‍ही करणी सेनेला माहिती दिली आहे. परंतु, ते मला त्रास देत आहेत.’

महत्वाच्या बातम्या –

You might also like