मला न्यूझीलंडला जाऊन रहायचंय तिथं कोरोना नाही

न्यूझीलंड या देशानं कोरोनाच्या काळात कमाल करून दाखवली आहे. मागील 100 दिवसात एकही कोरोना रूग्ण आढळून न आल्यानं आता न्युझीलंडवर कौतुकाचा वर्षाव होतोय.महिला पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वामुळं हे शक्य झाल्याचं बोललं जातंय. याच घटनेचा हवाला देत दिग्दर्शक केदार शिंदे यानं जॅसिंडा यांच कौतुक करताना दुसरीकडे मोदी सरकारवर केलेल्या टीकेनं आता एकचं खळबळ माजली आहे.

ट्विटरवर केदार शिंदे म्हणाले की, “मला न्युझीलंडला जाऊन राहायचंय. या 100 दिवसात तिथं एकही कोरोना रूग्ण आढळला नाही. महिला पंतप्रधान आहे. तिथं देवी जागृत आहे. आपण इथं फक्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा फतवाच काढणार… ” केदार शिंदेच्या या ट्विटनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. त्यांच्या या वक्तव्यानं त्यांना बरचसं ट्रोलही करण्यात आलं.

 

You might also like