विवेक ओबेरॉयची अभिनयानंतर निर्मिती क्षेत्राकडे वाटचाल

विवेक ओबेरॉयने बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच भूमिक केल्या. मात्र २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट केल्यामुळे विवेक चर्चेत आला. त्यानंतर आता विवेकने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

विवेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विवेक निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं सांगितलं आहे. ‘इति: कॅन यू सॉल्व्ह युआर ऑन मर्डर’’असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल मिश्रा करत आहे.

सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे या चित्रपटाचं चित्रीकरणही रखडलं आहे. मात्र याच वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे.

You might also like