विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी

विवेक ओबेरॉय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांच्यावरील एक मीम विवेक ओबेरॉयने ट्विट केल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे.

सोशल मीडियावरुन झालेल्या टीकेनंतर आता विवेक ओबेरॉयला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे मुंबई पोलिसांकडून विवेक ओबेरॉयला सुरक्षा देण्यात आली आहे.  परंतु विवेकला मिळणाऱ्या धमक्या कोणी दिल्या हे अद्याप समोर आले नाही.

विवेकच्या या ट्विटचे गंभीर पडसाद उमटले असून त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीसही पाठवली होती.

You might also like