विवेकने एकेकाळी ऐश्वर्याला दिले होते ३० महागडे गिफ्ट्स

बॉलिवूड म्हटलं कलाकारांच्या रिलेशनशीपविषयी नेहमीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. आजवर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लव्हलाइफ, अफेअर यांच्यामुळे चर्चेत आले आहेत. यातीलच एक जोडी म्हणजे  ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय  यांची आहे. कधी काळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.  विवेकने एकेकाळी चक्क एकाच वेळी ३० गिफ्ट दिल्याचं सांगण्यात येत आहे.

‘कंपनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विवेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. विवेकमुळेच ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक यांच्यात जवळीकता वाढली होती. इतकंच नाही तर विवेकने ऐश्वर्याला तिच्या वाढदिवशी चक्क ३० गिफ्ट दिले होते असं म्हटलं जातं.

ऐश्वर्याच्या ३० व्या वाढदिवशी विवेकने तिला सरप्राइज म्हणून ३० महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्यामुळे विवेकचं ऐश्वर्यावर मनापासून प्रेम असल्याचं म्हटलं जातं होतं. परंतु, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. हे दोघं विभक्त झाले. त्यानंतर या दोघांच्याही आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, ऐश्वर्या आज बच्चन कुटुंबाची सून असून तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं आहे. त्यांनी आराध्या ही लहानशी मुलगीदेखील आहे. तर विवेकनेदेखील २०१० मध्ये कर्नाटकचे दिवंगत माजी मंत्री जीवराज अल्वा यांच्या मुलीशी लग्न केलं आहे.

You might also like