आक्षेपार्ह मीम ट्विट केल्याप्रकरणी विवेक ओबेरॉयने मागितली माफी; ‘ते’ ट्विट केले डिलीट

एक्झिट पोलवरुन अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनवरील आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉय वादाच्या भोवऱ्यात सापडला.

विवेक ओबेरॉनने दोनवेळा ट्विट केले आहे. यातील पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कधी-कधी कोणाला पहिल्यांदा जे मजेशीर आणि निरपराध वाटते. ते दुसऱ्यांना बहुतेक वाटत नाही. मी गेली दहा वर्षे 2000 हून अधिक असहाय्य मुलींच्या सशक्तिकरणासाठी घालविली आहेत. मी कधीही कोणत्याही महिलेचा अपमान करण्यासंदर्भात विचार करु शकत नाही.’

याप्रकरणी विवेक ओबेरॉयने माफी मागितली असून पोस्ट करण्यात आलेले आक्षेपार्ह मीमचे ट्विट सुद्धा डिलीट केले आहे.

You might also like