टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का? प्रसिद्ध गायकाचा केंद्राला सवाल

गायक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात . समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम आपली प्रतिक्रिया देताना दिसून येतात. यावेळी विशालने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना थांबवण्यासाठी डीजे वाजवून पाहूया का? असा उपरोधिक टोला विशालने लगावला आहे.

लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही कोरोना नियंत्रणात आलेला नाही. उलट लॉकडाउनच्याच काळात देशभरातील लाखो लोकांना करोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर विशाल दादलानी याने ट्विट करुन सरकारवर टीका केली. “शेठ, देशात ५०० करोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत. आपण डीजे वाजवून पाहूया का?” असं ट्विट करत त्याने उपरोधिक टोला लगावला आहे.

देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख्यांच्या पुढे गेली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तरीही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होत चालली आहे. राज्यात तब्बल 6 हजार 497 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 2 लाख 60 हजार 924 वर पोहोचला आहे.

तर गेल्या २४ तासात राज्यात 4 हजार 182 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 1 लाख 44 हजार 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1 लाख 05 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.38 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

साराच्या ड्रायव्हरला कोरोना, सारासह कुटुंबियांची चाचणी आली…

You might also like