पत्रकाराशी भांडणाऱ्या कंगनाचा व्हिडिओ व्हायरल

आगामी ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटातील गाणं प्रदर्शित करण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने कंगना, राजकुमार राव आणि चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांची उपस्थिती होती. त्याचवेळी कंगनाच्या विचित्र वागण्याचा प्रत्यय उपस्थित पत्रकारांना आला.  एका पत्रकाराने कंगनाला प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच तिने त्याला ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाच्या वेळच्या प्रसंगाची आठवण करुन देत वादाला तोंड फोडलं.

आपल्या चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या पत्रकाराला ‘तुम तो हमारे दुश्मन बन गए यार….बडे घटिया बाते लिख रेह हो’, असं म्हणत कंगनाने धारेवर धरलं. तिचं जाहीरपणे हे असं वागणं पाहून संबंधित पत्रकाराला सुरुवातीला याचा अंदाज आला नाही. पण, त्याने लगेचच तिला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. शब्द वाढत गेले आणि अर्थातच वादाचं हे सत्र नव्या वळणावर आलं. कंगनाचं हे वागणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं म्हणत त्या पत्रकाराने थेट शब्दांत तिची चूक निदर्शनास आणून दिली.

You might also like