दीपिकाने शिकवलेला लुंगी डान्स-विन डिझेल

मुंबई : दीपिका पदुकोनचं हॉलिवूड पदार्पण असलेल्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज’ या चित्रपटाचा रेड कार्पेट इव्हेंट मुंबईत झाला. यावेळी दीपिकाने आपला सहकलाकार, हॉलिवूडस्टार विन डिझेलला लुंगी नेसवून ‘लुंगी डान्स’ करायला लावला.

भारतीय चाहत्यांचं प्रेम आणि त्यांनी केलेल्या स्वागतामुळे विन डिझेल भारावून गेला होता. दीपिका क्वीन आहे… एंजल आहे.. ती माझ्या आयुष्यात आहे, हे माझं भाग्य आहे, असं म्हणत विन डिझेलने दीपिकाच्या गालावर किस केलं आणि चाहतेही अवाक झाले. दीपिकानेही विनचं कौतुक स्वीकारत त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली. विन माझ्यासाठी एका टेडी बेअरसारखा आहे, असं दीपिका म्हणाली.

विन डिझेलने त्याच्या लहानपणीची एक आठवण सांगितली. माझे वडील मला एका भारतीय गुरुजींकडे घेऊन गेले होते. त्यावेळी मी नाव कमावेन, असं त्यांनी सांगितलं होतं. हेच माझं भारतीय कनेक्शन आहे, असं विन म्हणाला.

दीपिका-विनचा चित्रपट 20 जानेवारीला हॉलिवूडमध्ये प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदाची शपथ घेणार आहेत.

या सोहळ्याला रणवीर सिंग, शाहिद कपूर, इरफान खान, करण जोहर, क्रिती सॅनन, शबाना आझमी, हुमा कुरेशी यासारखे कलाकार उपस्थित होते.

You might also like