नवीन फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीत  एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. एम्सच्या या अहवालावर आता सुशांतचे वकील विकास सिंह यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे

विकास सिंह  यांनी ट्विट केले की, ‘एम्स पथकाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालामुळे  मी अस्वस्थ आहे. मी सीबीआय संचालकांना नवीन फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यासाठी विनंती करणार आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘एम्सची टीम मृतदेह न पाहता असा निर्णायक अहवाल कसा तयार करू शकते? तेही मुंबईतील कूपर रूग्णालयाच्या अशा पोस्टमॉर्टम अहवालावर, ज्यात मृत्यूची वेळही दिली गेली नाही.’

You might also like