विकास गुप्ताने सांगितल्या बालपणीच्या कटू आठवणी

विकास गुप्ताने काही दिवसांपूर्वीच तो बायसेक्शुअल असल्याचा खुलासा केला होता. त्याने केलेल्या गौप्यस्फोटानंतर सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगली आहे. आता विकासने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये त्याने लहान असताना त्याचे मित्र-मैत्रिणी त्याची कशी खिल्ली उडवायचे हे सांगितलं आहे.
“जेव्हा मी लहान होतो, तेव्हा शाळेत माझ्या वरच्या वर्गातील मुलं आणि माझे मित्र माझी कायम मस्करी करायचे. माझे हावभाव माझ्या ओठांची ठेवण यावर विनोद करायचे. ज्यावेळी मी सुट्टीत घरी यायचो, तेव्हा सुद्धा संध्याकाळी कॉलनीतील मुलं आणि मुलीसुद्धा मला चिडवायचे. हा बघा कसा मुलींसारखा वागतोय, विकास मुलगीच आहे, त्याचे हातवारे पाहा, असं म्हणत मोठ्या मुलीसुद्धा चिडवायच्या”, असं विकासने सांगितलं.