विद्युत जामवालचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा

बॉलीवूड इंडस्ट्रीत नाव कमावणारे कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळवत आहेत. यात अभिनेता विद्युत जामवालदेखील त्यापैकी एक आहे. जॅकी चॅन ऍक्‍शन मूव्ही अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला विद्युत आपल्या ऍक्‍शन आणि स्टंटसाठी ओळखला जातो. आता त्याच्या नावावर आणखी एक कामगिरी नोंदविण्यात आली आहे.

विद्युत जामवाल हा एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्याला या यादीत नाव नोंदविण्याचा मान मिळाला आहे. तो आपल्या चित्रपटात बॉडी डबल न वापरता धोकादायक स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास 2011 मध्ये “फोर्स’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या विद्युत जामवालने “कमांडो’ सीरीजमध्येही दमदार भूमिका साकारली आहे.

याशिवाय तो “बादशाहो’, “बुलेट राजा’ आणि “जंगल’ या चित्रपटांमध्ये झळकला होता. विद्युत जामवालचा आगामी “यारा’ हा चित्रपट 30 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

You might also like