Vidya Balan: विद्या बालनने दिला आठवणींना उजाळा…

अभिनेत्री विद्या बालनने होळी निमित्ताने तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यानिमित्ताने वयाच्या सोळाव्या वर्षी नकळत प्यायलेल्या भांगेमुळे दिवसभर आपण कसे हसत राहिलो याची आठवण तिने सांगितली. त्याचबरोबर रंगांचा हा उत्सव हा आपला आवडता सण असल्याचेही सांगितले.
होळीनिमित्त बनत असलेली इमृती ही एक प्रकारची जिलेबी तिचे आवडते पक्वान्न असल्याचे आणि रंग बरसे भीगे चुनरवाली हे गाणे सर्वात आवडते असल्याचेही ती म्हणाली. होळी म्हटले की, हे गाणे आठवणे अपरिहार्य आहे असेही तिचे म्हणणे आहे. रंग खेळत असताना सावधानी हवी असे सांगताना विद्या म्हणते, रंगांमुळे त्वचा व केस खराब होतात त्यामुळे रंग खेळण्याअगोदर खोबरेल तेल अवश्य केसांना व अंगाला लावावे. आगामी बेगमजान बद्दल बोलताना ती म्हणाली यात 1947 मध्ये झालेल्या भारत पाक फाळणीची पार्श्वभूमी असून यात विद्याने वेश्यालयाच्या मावशीची भूमिका केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत इला अरूण, गहरखानसह 11 अभिनेत्री आहेत.