प्रसाद ओकच्या पत्नीचा डान्स करतानाच व्हिडिओ व्हायरल

प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकचा उत्साह नेहमीच बगण्यासारखा असतो. मग कधी घरीच नानाविविध पदार्थ तयार करणं असो किंवा मग एखाद्या सण-उत्सवाची जय्यत तयारी करणं असो. नुकतीच गुरुपोर्णिमा साजरी झाली आहे यानिमित्त तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन काहीतरी खास चाहत्यांना पाहायला मिळालं.
मंजिरी चक्क माधुरी दीक्षितच्या चने कें खेत में… या गाण्यावर थिरकल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळालं. मी हा व्हिडिओ कधीच पोस्ट केला नसता, पण आता हा डान्स शिकवलेल्या माझ्या गुरूंनी म्हणजेच @pallavitolye नी आपल्या पेज वर तो टाकल्या मुळे आता संकोच करून काहीच उपयोग नाही हे लक्षात आलं..आणि तिचा आग्रह पण मला आजच्या दिवशी मोडावासा नाही वाटला ..पल्लवी तू आम्हाला हा आनंद देऊन कठीण काळात माझ्यासारख्या एका non dancer ला पण खूप सकारात्मक ऊर्जा दिलीस , कॉन्फिडन्स दिलास ..त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि मी प्रयत्न करून ही ह्या बदल्यात तुला गुरु दक्षिणा देऊ शकणार नाही…म्हणून फक्त इथूनच नमस्कार. असे मांजरीने या पोस्टला कॅपेंशन दिले आहे.