‘या’ मराठी अभिनेत्याने धरला तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा’ वर ताल

पुष्कर त्याच्या अभिनयासोबतच इतर अॅक्टीव्हीजमुळेदेखील चर्चेत असतो. अलिकडेच त्याने लॉकडाउनच्या काळात एक युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. विशेष म्हणजे या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तो चाहत्यांना नवनवीन सरप्राइज देत आहे. यामध्येच त्याने लावणी सादर करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे पुष्करला लावणी सादर करताना पाहून अनेक जण अचंबित झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये तो ‘तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा’ या गाण्यावर लावणी सादर करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही लावणी सादर करताना पुष्करने केलेला मेकअप, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, नृत्यकौशल्य पाहून तो पुष्करच आहे यावर कोणाचा विश्वास बसत नसल्याचं दिसून येत आहे.

पुष्करला या नव्या रुपात पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच हा व्हिडीओ सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय ठरत आहे. यापूर्वी बिग बॉस मराठीमध्ये एका टास्कदरम्यान पुष्करने लावणी सादर केली होती. त्यावेळीदेखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं सांगण्यात येतं.

You might also like