दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल

दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सरोज खान यांना काही दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसंच त्यांची करोना चाचणीसुध्दा केली. त्यात त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. पण आता त्या ठीक असून लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येऊ शकतं.

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यातही वयोवृद्धांना याचा असणारा धोका पाहता खान यांच्या बाबतीतही सावधगिरीचं पाऊल उचलण्यात आलं होतं. पण, त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यामुळं एक दिलासाच मिळाला आहे.

 

You might also like