ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा लिलावती रुग्णालयात

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना मंगळवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटदुखीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
काजोल आई तनुजाची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली. काही दिवसांपासून तनुजा यांना पोटदुखीचा त्रास जाणवत होता. हा त्रास वाढल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.