‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार कोरोना चाचणी

देशातील करोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्याच्या घडीला करोनामुक्त झालेल्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत तब्बल ५ लाख १५ हजार ३८५ जणांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आपली ‘कोरोना’ चाचणी करुन घेणार आहेत. सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरात त्यांचा ‘सी स्प्रिंग’ बंगला आहे. बंगल्याबाहेर नोटीसवर कंटेन्मेंट झोन असा उल्लेख करण्यात आला आहे.आता खबरदारीसाठी रेखाही आपली टेस्ट करुन घेणार आहेत.
Veteran actress #Rekha will soon be taking a #COVID19 test after members of her staff were tested positive for the virus. pic.twitter.com/ApYVzqw0jY
— Filmfare (@filmfare) July 13, 2020
दुसरीकडे, बच्चन कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी अमिताभ बच्चन, त्यानंतर त्यांचे अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सुदैवाने जया बच्चन, श्वेता बच्चन-नंदा, नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
सध्या जनक आणि जलसा येथे 28 जणांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर एकूण 56 जणांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांमधील सुमारे 30 कर्मचाऱ्यांची तपासणी केली.