ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचे निधन

रमेश मेढेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. जवळपास ५५ वर्षे ते रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या क्षेत्रात कार्यरत होते. थिएटर अकादमी, पुणे या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.

पीडीए मध्ये त्यांनी तू वेडा कुंभार, देवांचे मनोराज्य, देव चालले, अश्या नाटकांमधून विविध भूमिका केल्या. १९७३मध्ये थिएटर अकादमी, पुणेची स्थापना झाल्यावर त्यांची घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, तीनपैशाचा तमाशा, बेगम बर्वे अशा नाटकातून केलेल्या भूमिका गाजल्या.