ABCD-3 नाही तर ‘हे’ आहे वरूण – श्रद्धाच्या चित्रपटाचे ‘नाव’

रेमो डिसूजाचा डान्सवर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रेमोच्या ABCD या चित्रपटाचा तिसरा भाग आहे. आता या चित्रपटातील वरूण धवन व श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. स्ट्रीट डान्सर असे या चित्रपटाचे नाव आहे.

या चित्रपटात वरूण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटात श्रद्धा कपूर आणि वरूण धवनशिवाय प्रभूदेवा आणि नोरा फतेही यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच अमृतसरमध्ये सुरूवात झाली.

या चित्रपटात ‘एबीसीडी’मधील ‘बेगुनाह’ हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. स्ट्रीट डान्सर हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like