उषा नाडकर्णी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

उषा नाडकर्णी ‘बिग बॉस’ नंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेत दिसणार आहेत.

‘घाडगे & सून’ मालिकेत मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे आणि त्याचवेळेस माईंची चुलत सासू घाडगे सदनामध्ये येणार आहे. या चुलत सासूच्या भूमिकेत उषा नाडकर्णी दिसणार आहेत. माईंच्या चुलत सासूला अक्षयचे कियारासोबत दुसरे लग्न झाले हे माहित नाही. त्यामुळे आता अक्षय आणि अमृता पुन्हा एकत्र येणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

या मालिकेत चिन्मय उद्गीरकर अक्षयची तर भाग्यश्री लिमये अमृताची भूमिका साकारत आहेत तर माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like