‘बजेट’ मधेही झाला ‘उरी’ चा इफेक्ट; संसदेत How’s The Joshच्या घोषणा

पियूष गोयल यांनी अर्थसंकल्पात सिनेसृष्टीसाठी एक मोठा दिलासा दिला आहे. यापुढे भारतीय दिग्दर्शकांना चित्रिकरणासाठी एकाच ठिकाणी सर्व परवानगी मिळणार आहे. परदेशाप्रमाणे सिंगल विंडो पद्धतीने दिग्दर्शकांना चित्रिकरणासाठीच्या सर्व परवानगी एकाच ठिकाणी दिली जाईल, असे घोषणा गोयल यांनी केली.

पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पामध्ये चित्रपटसृष्टीतील काही योजना जाहीर करताना ‘उरी’चा उल्लेख केला. गोयल यांनी ही घोषणा करताना ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटातील अभिनेता विकी कौशल यांचा उल्लेख केला. उरीसाठी काश्मीरमध्ये चित्रिकरण करणे अशक्य असल्याने, कौशल यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. या चित्रपटाचे चित्रिकरण सैबेरियामध्ये करण्यात आले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत ही सुविधा केवळ विदेशातील दिग्दर्शना उपलब्ध होती. आता ती भारतीय दिग्दर्शकांना मिळणार आहे. यासंदर्भातील घोषणा करताना गोयल यांनी उरीचा उल्लेख करताच भाजपच्या सर्व खासदारांनी How’s The Joshच्या घोषणा दिल्या.

सिंगल विंडोसह गोयल यांनी चित्रपट लीक होऊ नयेत म्हणून तरतूद करणार असल्याचे सांगितले. चित्रपट हा अनेकांना रोजगार देणारे क्षेत्र आहे. अनेक वेळा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर तो लीक होतो. पायरसी रोखण्यासाठी सरकार कठोर कायदा करणार असल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –