वहिनी ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीमुळे चिडते श्वेता बच्चन नंदा

बच्चन कुटुंब बॉलिवूडमध्ये मोठ्या अभिमानाने जगत आहे.  बच्चन कुटुंबाच्या नावाची ख्याती केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण जगात आहे. बच्चन कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतात आणि हेच त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. बच्चन कुटुंबप्रमुख अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक आहेत तर त्यांची सून ऐश्वर्या राय हे विश्व सुंदरी आहे.

बच्चन कुटुंबात बरीच कलाकार आहेत पण बच्चन कुटुंबातील मुलीने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले नाही कारण तिला बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची गरज नव्हती आणि म्हणूनच श्वेता बच्चन ही बॉलीवूडमध्ये नसलेल्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहे.

दरम्यान श्वेता बच्चन नंदाने एका चॅट शोमध्ये आपल्या वहिनी विषयी मोठा खुलासा केला आहे. श्वेता बच्चन नंदाची वहिनी म्हणजेच ऐश्वर्या राय यांना संपूर्ण जग एक परिपूर्ण स्त्री म्हणत असेल परंतु श्वेता बच्चन नंदाला तिची एक सवय खूप वाईट वाटते यामुळे आजही ती संतापलेली आहे.

श्वेता बच्चन नंदा म्हणाली की ऐश्वर्या राय फोन व मेसेजचे उत्तर कधीच देत नाही यामुळे मला तिच्यावर खूप राग येतो पण आजपर्यंत फोन आणि मेसेजला उत्तर का देत नाही हे माहित नाही. पण श्वेता बच्चन नंदा पुढे म्हणाली की ऐश्वर्याला आत्मविश्वास खूप आहे जो मला खूप आवडतो.

 

You might also like