शेवंताचे ‘हे’ फोटो पाहून अण्णा नाईकांची पडेल विकेट

रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताची केमिस्ट्री महाराष्ट्रात कोणाला माहित नसेल असं होऊच शकत नाही. आता लॉकडाऊन नंतर  मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेतली शेवंता फेम सर्वांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही लॉकडाऊनमध्ये सतत चाहत्यांच्या संपर्कात होती.अनेक नानाविविध रेसिपीज्, हटके फोटो, व्हिडीओ इतकंच काय तर युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

आता नुकताच तिने एक मॉर्डन लुकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या जबरदस्त आणि दिलखेचक अदा असलेला फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.

आता शेवंताला या अवतारात  पाहून अण्णा नाईकांची विकेट तर नाक्की जाणार. रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील अण्णा-शेवंताची केमिस्ट्री तुफान गाजतेय, त्यामुळे मालिकेचे लॉकडाऊननंतरचे भाग पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर झाले आहेत.

You might also like