लग्नानंतर बदलले रणवीरचे आयुष्य; ‘या’ तीन गोष्टी करण्यास मनाई…!

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले.या लग्नाकडे अख्ख्या देशाच्या नजरा होत्या.  पण आता लग्नानंतर त्यांचे आयुष्य बदलणारचं. रणवीरशी लग्न करून दीपिकाचे आयुष्य कसे व किती बदलले, ते ठाऊक नाही. पण दीपिकाशी लग्न केल्यानंतर रणवीरच्या आयुष्यात काही गोष्टी मात्र नक्कीच बदलल्यात.

एका मुलाखतीत रणवीर यावर बोलला. लग्नानंतर कुठल्या तीन गोष्टी करण्यास तुला मनाई करण्यात आलीय? असा प्रश्न रणवीरला विचारण्यात आला. यावर रणवीरने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. त्याने सांगितले की, पहिली गोष्ट म्हणजे, मी रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, मी काहीतरी खाल्याशिवाय घर सोडू शकत नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी बायकोचा कॉल मिस करू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या –

You might also like